मानवतेचा प्रकाशः डॉ. प्रकाश आमटे बाबा आमटेंनी पाहिलेल्या अंत्योदयाच्या स्वप्नाला स्वतःच्या ध्येयासक्त जगण्याने मूर्त रूप देणारे, डॉ. प्रकाश...
मानवतेचा प्रकाशः डॉ. प्रकाश आमटे
बाबा आमटेंनी पाहिलेल्या अंत्योदयाच्या स्वप्नाला स्वतःच्या ध्येयासक्त जगण्याने मूर्त रूप देणारे, डॉ. प्रकाश आमटे यांना जन्मदिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा...
बाबा आणि साधनाताईंच्या विचारांचा वारसा पुढे चालवताना, डॉ. प्रकाश आमटे यांनी निःस्वार्थ सेवेचा आदर्श निर्माण केला. भामरागडसारख्या अत्यंत दुर्गम भागात, जिथे ना रस्ते होते ना इतर मूलभूत सुविधा; तिथे त्यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून माडिया गोंड आदिवासी बांधवांच्या आयुष्यात नवी पहाट आणली आणि त्यांना अर्थपूर्ण जगण्याची संधी दिली.
एका डॉक्टरच्या भूमिकेपलीकडे जाऊन त्यांनी तिथल्या मातीत प्रेम आणि विश्वासाचं नातं पेरलं. त्यांच्यासाठी वेदनेला कोणताही आकार किंवा जात नसते; मग ती वेदना माणसाची असो वा मुक्या प्राण्याची. 'लोकबिरादरी प्रकल्पा'च्या माध्यमातून उभे राहिलेले हे कार्य म्हणजे केवळ एक प्रकल्पस्थान नसून माणुसकीची अथांग शाळा आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त, या निस्वार्थ, शांत आणि ठाम सेवाप्रवासाला विनम्र अभिवादन. वंचितांच्या सेवेसाठी जिथे गरज असेल तिथे खंबीरपणे पाय रोवून उभे राहतात.

No comments