यावल येथे अवैध जळाऊ लाकूड वाहतुकीवर वन विभागाची मोठी कारवाई; 4.60 लाखांचा मुद्देमाल जप्त भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
यावल येथे अवैध जळाऊ लाकूड वाहतुकीवर वन विभागाची मोठी कारवाई; 4.60 लाखांचा मुद्देमाल जप्त
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10:25 वाजेच्या सुमारास यावल–फैजपूर मार्गावर गस्त घालत असताना वन विभागाच्या पथकाने अवैध जळाऊ लाकूड वाहतुकीवर मोठी कारवाई केली. या कारवाईत MH-19 Z 2499 क्रमांकाचा ट्रक अडवून त्यामध्ये निंब, बाभूळ व चिचोल प्रजातीचे 12 घनमीटर जळाऊ लाकूड बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी वाहनचालक शेख मोहिनुद्दीन शेख उद्बोदिन (रा. रावेर) यांच्याकडे कोणताही वैध वाहतूक परवाना नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे भारतीय वन अधिनियम 1927 मधील कलम 41 (2)(ब), 42, 52 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 मधील नियम 31 व 82 अंतर्गत कारवाई करत ₹10,248/- किमतीचे जळाऊ लाकूड व अंदाजे ₹4.50 लाख किमतीचा ट्रक, असा एकूण ₹4.60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल मुख्य विक्री केंद्र, यावल येथे जमा करण्यात आला.
या प्रकरणी आगार रक्षक, यावल यांनी गुन्हा क्रमांक 04/2025 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई मा. उप वनसंरक्षक (सो.) यावल वन विभाग, जळगाव, मा. सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल तसेच मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (सो.) यावल पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कारवाईदरम्यान मोहमांडली राऊंड स्टाफ व आगार रक्षक यावल उपस्थित होते.

No comments