पुसेगांवच्या यात्रेत दहशत,दरोडा टाकणाऱ्या के.एम कंपनीच्या दोन संशयितांना पुसेगांव पोलिसांकडून अटक, पुसेगांव पोलिसांची दमदार कामगिरी ! (स...
पुसेगांवच्या यात्रेत दहशत,दरोडा टाकणाऱ्या के.एम कंपनीच्या दोन संशयितांना पुसेगांव पोलिसांकडून अटक, पुसेगांव पोलिसांची दमदार कामगिरी !
(सातारा जिल्हा) सौ. माधवी गिरी गोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील पुसेगांव हे तीर्थक्षेत्र श्री. सेवागिरी देवस्थान म्हणून या पुसेगांव नगरीला ओळखले जाते पुसेगांव पोलीस हे सर्व सामान्य नागरिकांसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता येण्यासाठी पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडत असल्याची ठाम ग्वाही पुसेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली आहे. पुसेगांव गावात यात्रेच्या दरम्यान करंजाळे मळा या शिवारात धारदार शस्त्रांचा धाक दाखवून फिर्यादी निखिल जाधव आणि सुरज जाधव यांच्याकडील जवळपास 10,000 हजार रुपयांचा मुद्देमाल घेवुन गेलेल्या करण बचाराम मदने (वय 21) रा.भवानी पेठ ता. खटाव जिल्हा सातारा) के.एम कंपनी नावाने खटाव भागात आणि परिसरांत प्रवृत्तींच्या युवकांचा अनाधिकृत ग्रुप तयार करून गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. आणि त्याच्या साथीदाराला पुसेगांव पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करून अटक केली आहे. त्याच अनुषंगाने यात्रेदरम्यान घडलेल्या लुटमारीच्या घटनेत रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतीश जाधव सर्व रा.नवलेवाडी ता. माण जि. सातारा) आणि शुभम शशिकांत जाधव रा. सिद्धेश्वर कुरली ता. खटाव जि. सातारा) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र फरारी आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली होती. दहशत माजवणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याचे निवेदन ग्रामस्थांनी पुसेगांव पोलीस ठाणेत दिले होते. त्या अनुषंगाने पुसेगांव पोलिसांनी तांत्रिक माहिंतीच्या आधारे संशयित करण मदने आणि शुभम जाधव याला कराड-मसूर परिसरांतून ताब्यात घेतले आहे. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुसेगांव पोलिसांकडून आता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर देखील कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना भयमुक्त वातावरणात राहण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचे पालन होणार आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी-पाटील पुसेगांव पोलीस ठाण्याचे स.पो.नि.संदीप पोमण सहा.फौ. सुधाकर भोसले, दीपक बर्गे, योगेश बागल,दऱ्याबा नरळे, अविनाश घाडगे, राहुल जाधव, उमेश चव्हाण,आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुसेगांव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments