राज्यांत चार बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! राकेश ओला अमरावतीला, तर डॉ. बसवराज तेली आता पुन्हा पुणे शहरांत! सौ. शुभांगी सरोदे ( पुण...
राज्यांत चार बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! राकेश ओला अमरावतीला, तर डॉ. बसवराज तेली आता पुन्हा पुणे शहरांत!
सौ. शुभांगी सरोदे ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोलीस खात्यामध्ये आता हळुवार बदल्यांचे वारे चांगलेच वाहू लागले आहे. यामध्ये आज रोजी राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने चार बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुढील प्रमाणे आयपीएस अधिकारी... राकेश ओला बृहन्मुंबई ते अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून तर डॉ. बसवराज तेली- पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर येथे तर प्रदीप वसंतराव जाधव- गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड येथे तर गणेश प्रवीण इंगळे - पोलीस उपायुक्त अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्स पुणे ते पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड येथे पदस्थापना देण्यात आली आहे. बदल्या झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी पदभार घेण्याचे आदेशही तात्काळ देण्यात आले आहेत.

No comments