adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लग्नाचा बनाव..जेष्ठ नागरिकाचे अपहरण व दरोड्याचा थरार.पाठलागानंतर सराईत गुन्हेगार जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई!

  लग्नाचा बनाव..जेष्ठ नागरिकाचे अपहरण व दरोड्याचा थरार.पाठलागानंतर सराईत गुन्हेगार जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त...

 लग्नाचा बनाव..जेष्ठ नागरिकाचे अपहरण व दरोड्याचा थरार.पाठलागानंतर सराईत गुन्हेगार जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१५):-वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून जेष्ठ नागरिकाचे अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगरमध्ये थरारक पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनच्या जिगरबाज पथकाने दोन आरोपींना जेरबंद केले असून अपहरित जेष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,रिसोड पोलीस स्टेशन, जि.वाशिम येथे गुन्हा रजिस्टर नंबर 980/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 333, 140(2), 61(2), 324(4), 351(3), 352, 3(5) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.आरोपींनी लग्नाचा खोटा बनाव करून फसवणूक केली.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीचे वडील सिताराम नारायण खानजोडे (वय 60 वर्षे, रा. आसेगांव, ता. पेन, जि. वाशिम) यांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले.यानंतर आरोपी अपहरित इसमास घेऊन जात असताना मापे गावाचे शिवार, ता. रिसोड, जि. वाशिम येथे फिर्यादी श्री. अंकुश मोहन राठोड (रा. बोरगडी, तांडा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड) हे मित्रासह दवाखान्यात जात असताना त्यांच्या गाडी क्रमांक एम.एच. 14 एफ.जी. 9849 ही आडवून गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी जिवे मारण्याची धमकी देत 22,000/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटण्यात आली. या घटनेप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 981/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2), 311, 324(3), 126(2) प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरील गुन्ह्यांची माहिती वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांना दिली.त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोनि श्री. किरणकुमार कबाडी,सपोनि श्री. हरिष भोये,पोलीस अंमलदार दिपक घाटकर,गणेश धोत्रे, भिमराज खर्से,राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे,सतिष भवर,योगेश कर्डीले,बाळासाहेब खेडकर,उमाकांत गावडे यांचे विशेष पथक तयार करून शेंडी बायपास,एम.आय.डी.सी., अहिल्यानगर येथे नाकाबंदी करण्यात आली.नाकाबंदी दरम्यान छत्रपती संभाजीनगरकडून अहिल्यानगरच्या दिशेने एक कार भरधाव वेगात येताना दिसून आली. पोलिसांनी संशयित कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने कार एम.आय.डी.सी.च्या दिशेने भरधाव वेगात पळवली.याबाबत एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सतिष खामकर,सुरेश देशमुख,अक्षय रोहोकले यांना माहिती देऊन कार थांबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या.पोलिसांनी संशयित कारचा पाठलाग करत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार एम.आय.डी.सी. परिसरातील कॉटेज कॉर्नर येथे डिव्हायडरवर आदळली व बंद पडली.त्यावेळी कारमधील इसमांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीअंती त्यांची नावे राहुल दिलीप म्हस्के (वय 32 वर्षे, रा. जालना), सतिष उर्फ बालु विनायक जाधव (वय 29 वर्षे, रा. जालना) तसेच अपहरित जेष्ठ नागरिक सिताराम नारायण खानजोडे अशी निष्पन्न झाली.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली. अपहरित जेष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका करून आरोपींसह त्यांना पुढील तपासासाठी रिसोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments