मुलांसाठी काळजी आरोग्याची आणि दंत चिकित्सा शिबिर प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुला...
मुलांसाठी काळजी आरोग्याची आणि दंत चिकित्सा शिबिर
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुलांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेणे त्यांच्यात आरोग्याची जागरूकता निर्माण करणे यासाठी आज काळजी आरोग्याची आणि दंत चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ एच एम ठाकुर यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्राचार्यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.डॉक्टरांचा परिचय एस आर ठाकुर यांनी करून देत सदर उपक्रमाची रूपरेषा सांगीतली आपल्या आरोग्यासाठी
संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणाव कमी करणे, भरपूर पाणी पिणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे असे आव्हान केले.
प्राचार्य व्ही एम चौधरी यांनी आरोग्याची काळजी घेतांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याचा विचार करून त्यासाठी सकस अन्न खाणे, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे, नियमित तपासणी करणे आणि व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे असे मत मांडले.
तर मार्गदर्शक डॉक्टरांनी आरोग्यासाठी
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचा आहारात समावेश करा. मीठ, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी कमी करा.दररोज व्यायाम करा
दररोज रात्री ७-९ तास झोप घेणे महत्त्वाचे आहे.ध्यान, योगा किंवा छंद जोपासून ताण कमी करा.शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.वैयक्तिक आणि सभोवतालची स्वच्छता राखा. डॉक्टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्या आणि लसीकरण पूर्ण करा.मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि भावनिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा.मित्र आणि कुटुंबाशी चांगले संबंध ठेवा.सकाळी लवकर उठा.तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय करा.या प्रमाणे सविस्तर माहिती दिली.सर्व मुलांची दंत चिकित्सा शिबिर घेऊन तपासणी केली.प्रसंगी सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.


No comments