स.पो.नि. योगिता नारखेडे पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून ओळख! (जळगांव जिल्हा) संभाजी पुरी गोसा...
स.पो.नि. योगिता नारखेडे पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून ओळख!
(जळगांव जिल्हा) संभाजी पुरी गोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या स.पो.नि. योगिता मधुकर नारखेडे या पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील, कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. स.पो.नि. योगिता नारखडे यांनी जळगांव जिल्हा पोलीस दलात कासोदा, पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तर पोलीस मुख्यालयात देखील त्यांनी विविध पदावर काम पाहिले आहे. कायदा सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंधक, महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणे, तसेच जनतेशी संवाद वाढवण्यावर त्यांनी विशेष भर देत प्रभावी कामगिरी बजविली आहे. नुकतीच त्यांची पुन्हा पोलीस मुख्यालयातून नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून वर्णी लागली आहे. नव्याने दाखल झालेल्या पोलीस ठाण्याच्या परिसरांत तही तिथेही आता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाया आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय दिलासा देणे, हा त्यांचा प्रमुख उद्देश राहणार आहे. विशेषता:- महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक भूमिका, गुन्हेगारांवर झिरो, टोलरन्स आणि पोलीस जनता संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांचा कायम भर राहणार आहे. पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला अधिकारी मिळाल्याने स.पो.नि. योगिता नारखेडे यांच्या इंट्रीमुळे नशिराबाद पोलीस ठाण्याच्या परिसरांतील सर्वसामान्यांकडून त्यांचे स्वागत होत आहे. पोलीस अधीक्षक डॉ . महेश्वरी रेड्डी यांच्या आदेशावरून बदली झाल्यानंतर त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्याचा तात्काळ पदभार देखील स्वीकारला आहे.

No comments