adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूरमध्ये भक्तीचा महासोहळा “एक शाम खाटूवाले के नाम” भव्य भजन सोहळ्याचे आयोजन

 मलकापूरमध्ये भक्तीचा महासोहळा “एक शाम खाटूवाले के नाम” भव्य भजन सोहळ्याचे आयोजन    अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकाप...

 मलकापूरमध्ये भक्तीचा महासोहळा

“एक शाम खाटूवाले के नाम” भव्य भजन सोहळ्याचे आयोजन   


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  श्रद्धा, भक्ती आणि संगीतमय भजनांच्या सुरांनी मलकापूर शहर लवकरच भारावून जाणार असून “एक शाम खाटूवाले के नाम” या भव्य भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. बाबा श्यामजींच्या दिव्य दरबारात होणाऱ्या या भक्तीमय कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

या भव्य भजन संध्येत अलौकिक शृंगार, अखंड ज्योत, इत्र केसर व पुष्पवृष्टी अशा विशेष धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बाबा श्यामजींचा दरबार आकर्षक स्वरूपात सजविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देणारे भव्य फ्लेक्स मलकापूर शहरात झळकू लागले असून भाविकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

ही भजन संध्या दि. 1 जानेवारी २०२6 रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून प्रभू इच्छेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्थळ श्री श्याम दरबार, श्री श्याम मंदिर, श्री बजरंग इंडस्ट्रिज प्रांगण, नांदुरा रोड, मलकापूर (जि. बुलढाणा) असे आहे.

या भक्तीमय संध्येत सुप्रसिद्ध भजन गायक शिवम रावल (खरगोन, इंदूर) बाबा श्यामजींच्या महिम्याचे गुणगान करणार असून त्यांच्या सुमधुर भजनांनी भाविक भक्तिरसात न्हाऊन निघणार आहेत.

हा भव्य धार्मिक सोहळा “करणे वाले श्याम, कराने वाले श्याम” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला असून मलकापूरसह परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

No comments