मला कोणत्याही परिस्थितीत अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही:- छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या कुरवेल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- ...
मला कोणत्याही परिस्थितीत अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही:- छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या कुरवेल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
छन्नू झेंडू पाटील उर्फ गोरख तात्या कुरवेल (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) या पक्षात सक्रियपणे कार्यरत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, पक्षात जो मान–सन्मान दिला आणि कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.मात्र अलीकडच्या काळात मला वारंवार विविध पक्षांकडून फोन कॉल करून अन्य पक्षात प्रवेश करण्याबाबत विनंती केली जात आहे. याबाबत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की,
👉 मला कोणत्याही परिस्थितीत अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही.
👉 माझी निष्ठा पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्याशीच आहे.
👉 शरद पवार साहेबांचे विचार, नेतृत्व व धोरण यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळे यापुढे मला कोणत्याही पक्षाने किंवा व्यक्तीने पक्षप्रवेशाबाबत फोन कॉल, संपर्क किंवा दबाव टाकू नये, ही नम्र पण ठाम विनंती आहे. मी ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात राहून समाजहितासाठी व जनतेसाठी काम करत राहणार आहे.
छन्नू झेंडू पाटील
(गोरख तात्या कुरवेल)
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
(शरदचंद्र पवार गट)

No comments