फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय...
फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयात वीर बाल दिवस उत्साहात साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर धनाजी नाना महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विवेक महाजन उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील होते. कार्यक्रमात बोलताना प्रा. विवेक महाजन यांनी वीर बालकांचे बलिदान, त्याग व राष्ट्रप्रेम यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी स्वयंसेवकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सतीश पाटील यांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व स्पष्ट करत युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमास एनएसएसचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएसच्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

No comments