adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव शविआच्या गटनेतेपदी निलेश चौधरी प्रतोदपदी परमेश्वर महाजन निवड

 धरणगाव शविआच्या गटनेतेपदी निलेश चौधरी प्रतोदपदी परमेश्वर महाजन निवड  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव, प्रतिनिधी - नु...

 धरणगाव शविआच्या गटनेतेपदी निलेश चौधरी

प्रतोदपदी परमेश्वर महाजन निवड 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव, प्रतिनिधी - नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत धरणगाव शहर विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांच्यासह आठ नगरसेवक विजयी झाले आहेत. शविआच्या पालिकेतील गटनेतेपदी निलेश सुरेश चौधरी यांची तर प्रतोदपदी परमेश्वर भगवान महाजन यांची निवड करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते दोघां नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

धरणगाव शहर विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाताई चौधरी यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या आधी शविआचा गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या गटनेतेपदी निलेश चौधरी यांची तर प्रतोदपदी परमेश्वर महाजन यांची निवड करण्यात आली. याबाबत अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या कार्यालयात गटनेते आणि प्रतोद यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. प्रसंगी धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी यांच्यासमवेत नगरसेवक लक्ष्मण माळी, प्रमिला शिरसाठ, भारती महाजन, सुनिल चौधरी, ज्योती  पाटील, हेमांगी अग्निहोत्री यांसह शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments