मतमोजणीनंतर विजय उत्सवात नोटा उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल मलकापूरात मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- ...
मतमोजणीनंतर विजय उत्सवात नोटा उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल
मलकापूरात मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी झाल्यानंतर विजय उत्सव साजरा करताना नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी पो.स्टे. मलकापूर शहर येथे कायमी गुन्हा क्र. ८५१/२०२५ दाखल करण्यात आला असून हा गुन्हा कलम १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात श्री. विठ्ठल बाळासाहेब भुसारी, उपमुख्याधिकारी, नगर परिषद मलकापूर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव अतिकभाई जवारीवाले, रा. पारपेठ, ता. मलकापूर, जि. बुलढाणा असे आहे.
ही घटना दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास, लोखंडी रेल्वे पुलाजवळ, पारपेठकडील बाजूस, मलकापूर येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपीने नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांना बोलावून विजय उत्सव साजरा केला. या दरम्यान त्यांने स्वतः नोटा उधळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे कृत्य महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नगर परिषद निवडणूक २०२५ साठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोहेकॉ. मोहम्मद रिजवान यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे (पो.स्टे. मलकापूर शहर) करत आहेत. प्रकरणात अद्याप कोणताही माल जप्त करण्यात आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे निवडणूक काळातील आचारसंहितेच्या पालनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन व पोलिसांची पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments