हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक सुफी संत हजरत पीर बालेश बाबा उर्स यात्रा! ५जानेवारीला संदल शरीफ,६ रोजी कव्वाली मुकाबला तर ७ ला कुस्ती स्पर्धा ...
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक सुफी संत हजरत पीर बालेश बाबा उर्स यात्रा!
५जानेवारीला संदल शरीफ,६ रोजी कव्वाली मुकाबला तर ७ ला कुस्ती स्पर्धा सामना होणार!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या सुफी संत हजरत पीर बालेशा बाबा रहेमतुल्लाह अलै सरकार यांचा उर्स सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही मोठा थाटाने जल्लोषात साजरा केला जाणार आहे हजरत पीर बालेशा बाबा दर्गा पंचक्रोशीतील जातीय सलोखा एकात्मता अबाधित व कायम असलेले एकमेव तीर्थस्थान आहे ५व ६,७, जानेवारी२०२६ या तीन दिवस या बाबां ची उरुस यात्रेचे आयोजन दरवर्षी हिंदू मुस्लिम एकता उर्स कमेटी तर्फे करण्यात येते या यात्रेला नववर्षाच्या ५जानेवारी पासून सुरुवात होणार आहे यात दि ५जानेवारी रोजी हजरत पीर बालेशा बाबा चादर संदल मोठ्या धुमधडाक्यात मिरवणूकीने चढविली जाईल
तर ६जानेवारीला कव्वाली कार्यक्रम होणार असून यात मुंबई येथील सुप्रसिध्द सुफी गायक कौसर साबरी ल भोपाल येथील प्रख्यात गझल गायीका निशाद नाज साबरी यांच्यात कव्वालीचा रंगतदार जंगी मुकाबला चे आयोजन हिंदू मुस्लिम एकता उर्स कमेटी तर्फे आयोजित करण्यात आला आहे नवसाला पावणारा हजरत पीर बालेशा बाबा रहेमतुल्लाह अलै यांच्या उर्स निमित्ताने नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक वर्ग या दर्गा वर येत असतात संदल व उर्स निमित्ताने मोठा वाघोदा बुद्रुक येथे मोठी यात्रा भरते व तीन दिवसीय यात्रे दरम्यान गांवकरी दर्गा परिसरात तसेच विविध ठिकाणी लंगर भंडारा महाप्रसादाचे आयोजन करतात हजरत पीर बालेशा बाबा यांचा उर्स सोहळा राज्यभरात सुप्रसिद्ध असून हजारोंच्या संख्येने भाविक या उर्स यात्रा सोहळ्यात सहभागी होतात तरी जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थिति देऊन दर्शनाचा व कव्वाली कार्यक्रम गीत गझल गखयनाचा मंत्रमुग्ध आनंद घ्यावा असे आवाहन हिंदू मुस्लिम एकता उर्स कमेटी तर्फे करण्यात आले आहे



No comments