धनाजी नाना महाविद्यालयात रक्तदान शिबिर इदू पिंजारी फैजपूर संपादक हेमकांत गायकवाड फैजपूर : येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय से...
धनाजी नाना महाविद्यालयात रक्तदान शिबिर
इदू पिंजारी फैजपूर
संपादक हेमकांत गायकवाड
फैजपूर : येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने धनाजी नाना चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे अध्यक्ष दादासाहेब शिरीष मधुकरराव चौधरी, आदरणीय लीलाधर विश्वनाथ चौधरी, डॉ. एस. के. चौधरी, डॉ. एम. टी. फिरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरात ग्रामीण रुग्णालय न्हावी येथील डॉ सौरभ ढोले जळगाव जिल्हा रुग्णालय येथील डॉ मिनू व आयसीटीसी सेंटर येथील समुपदेशक श्री मनोज चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. एनएसएसचे स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.

No comments