adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लूद येथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सव आनंदात साजरा

 पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लूद येथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सव आनंदात साजरा   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पो...

 पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लूद येथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सव आनंदात साजरा  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लूद येथे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या नाताळ सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ख्रिसमसनिमित्त भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मूल्यवान सहकार्य लाभले.


प्राचार्य श्री. सचिन बनसोडे यांनी नाताळ हा शांती, प्रेम आणि सद्भावनेचा संदेश देणारा सण असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. आगामी नवीन वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रगती, आनंद आणि सकारात्मकतेने भरलेले जावो, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. उपप्राचार्य श्रीमती रेखा मुळे यांनी नाताळ सणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

      प्राचार्य

श्री. सचिन बनसोडे

पोदार इंटरनॅशनल स्कूल, अक्लूद

No comments