फैजपूर येथे श्रीमद भागवत गीता पठण परीक्षेत महिला उत्तीर्ण इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ।येथील श्रीमद भागवत कथा ज...
फैजपूर येथे श्रीमद भागवत गीता पठण परीक्षेत महिला उत्तीर्ण
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर ।येथील श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीने श्रीमद भगवत गीता संपुर्ण 18 अध्याय तोंडी पाठ करणे बाबत उपक्रम महिला वर्गा साठी आयोजित केला होता ही परीक्षा फैजपूर येथील गावातील श्रीराम मंदिर येथे पार पडली परीक्षक गीतादास चंद्रकांत महाराज साक्रीकर हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सचिव व डिंगम्बर महाराज मठ अध्यक्ष नरेंद्र नारखेडे होते या उपक्रमात श्रीमद भगवत गीता चे संपूर्ण 18 अध्याय चार महिलांनी तोंडीपाठ म्हणून दाखविले या परीक्षेत कुंदा लक्ष्मण पाटील भुसावळ सुहासिनी गंगाधर चौधरी फैजपूर रविंद्र भारम्बये ज्योसना त्रंबक इंगळे न्हावी या महिला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत समितीने दि 4 जानेवारी ते 11 जानेवारी या काळात भव्य दिव्य सामूहिक तुळशी अर्चन व नामजप संगीत रामायण नामसंकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात या उत्तीर्ण महिलाचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली श्रीमद भगवत गीता तत्वज्ञान जीवन आदर्श बनविणे साठी अत्यन्त उपयुक्त आहे यासाठी हा उपक्रम समाज हितासाठी राबविण्यात येत आहे कार्यक्रमास किरण चौधरी काशीनाथ वारके सुरेश परदेशी किशोर कोल्हे एन पी चौधरी एल आर पाटील दिलीप पाटील राजाराम महाजन सह गीता पाठ महिला मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments