महिलेला धमकावून घरफोडी करणारे आरोपी जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.. पोलिसांच्या कारवाईने ग्रामीण भागाला दिलासा सचिन मोकळं अहिल्य...
महिलेला धमकावून घरफोडी करणारे आरोपी जेरबंद..स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.. पोलिसांच्या कारवाईने ग्रामीण भागाला दिलासा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२):-पारनेर तालुक्यातील माळकुप येथे वृद्ध महिलेस धमकी देऊन केलेल्या घरफोडी-चोरी प्रकरणाचा थरारक उलगडा स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या काही दिवसांत करत आरोपीला जेरबंद केले आहे.या कारवाईमुळे ग्रामीण भागातील चोऱ्यांच्या मालिकेमागील धागेदोरे उकलण्यास मोठी मदत झाली आहे.दि.22 नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारास रहिंजवाडी,माळकुप येथील 50 वर्षीय हौसाबाई कोंडाजी रहिंज या घरात एकट्याच झोपलेल्या होत्या. त्यांना उठणे-बसणे कठीण असल्याने सुन इंदुबाईंनी घराबाहेरून कुलूप लावले होते. याच संधीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.घरात झोपलेल्या वृद्ध महिलेस गप्प बसण्याची धमकी देत, “आरडा ओरड केलास तर ठार मारू” असा दम देत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम हिसकावून चोरट्यांनी पलायन केले.या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घरफोडी प्रकरणे उघडकीस आणण्याच्या कडक सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या,त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पथकाने तांत्रिक विश्लेषण,सीसीटीव्ही, गुप्त बातमीदार व अनुभवाच्या जोरावर शोधमोहीम सुरू केली. अखेर 30 नोव्हेंबर रोजी नेप्ती नाका परिसरात संशयित गणेश रमेश काकडे (रा.आंबेगाव,पुणे) दिसल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला शिताफीने जेरबंद केले.अक्षय उर्फ सोन्या भोसले (फरार),गंड्या भोसले (फरार) अशांसह गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सोन्याच्या मणी,कानातील कुडके,नथ असे एकूण 62,956 रुपये किमतीचे दागिने जप्त केले.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली,
पो.नि.किरणकुमार कबाडी
सपोनि.हरिष भोये,पोलीस अंमलदार अतुल लोटके,गणेश लोंढे,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,सागर ससाणे,रोहित येमुल, आकाश काळे,बाळासाहेब गुंजाळ,मनोज साखरे,प्रशांत राठोड,चालक अरुण मोरे
यांनी केली.या कारवाईमुळे पारनेर तालुक्यातील सलग घरफोड्यांचे गूढ उकलले असून सर्वत्र पोलिसांच्या कौतुकाचीच चर्चा आहे.फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही पकडले जाईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

No comments