adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किसान महाविद्यालयात जागतिक एडस दिन साजरा

 किसान महाविद्यालयात जागतिक एडस दिन साजरा  पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा येथील किसान महाविद्यालयात सोमवार दि १ डिसेंब...

 किसान महाविद्यालयात जागतिक एडस दिन साजरा 


पारोळा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा येथील किसान महाविद्यालयात सोमवार दि १ डिसेंबर २०२५ रोजी रासेयो एकक रेड रिबन क्लब आणि कुटीर रूग्णालय पारोळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस दिन साजरा करण्यात आला.दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर पसरलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक व्यक्तकार्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे.

याअनुशंघाने जनजागृतीपर सामुहिक शपथीचे तसेच पारोळा शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. डी. बी. साळुंखे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. गायकवाड कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र पाटील, आयसीटीसी विभाग कर्मचारी किशोर पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ बबन महाजन तसेच साने गुरुजी फाउंडेशनच्या लिंक वर्कर प्रिया धनके उपस्थित होत्या. प्रा. के. एस. गायकवाड यांनी प्रास्ताविकातून एडस दिन साजरा करण्यामागचे हेतू स्पष्ट केले. डॉ. जितेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून एडस आजाराची कारणे, लक्षणे आणि टाळण्या संबंधीचे उपाय यावर थोडक्यात मार्गदर्शन केले. हा दिवस एड्स विरोधातील लढ्यात एकता दर्शवून एड्सग्रस्त लोकांसाठी सहानुभूती व सामाजिक समज वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा मंच असल्याचे मत प्राचार्य डॉ.वाय. व्ही.पाटील यांनी स्पष्ट केले. आभार प्रा.आशा पाटील यांनी मांडलेत.

No comments