adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोतवाली पोलिसांचा धडाका..! लाखोंच्या मोबाईल टॉवर बॅटऱ्या जप्त तिघे जेरबंद

 कोतवाली पोलिसांचा धडाका..! लाखोंच्या मोबाईल टॉवर बॅटऱ्या जप्त तिघे जेरबंद   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (...

 कोतवाली पोलिसांचा धडाका..! लाखोंच्या मोबाईल टॉवर बॅटऱ्या जप्त तिघे जेरबंद  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२):-कोतवाली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांच्या LINEAGE POWER कंपनीच्या मोबाईल टॉवरवरील १२ बॅटऱ्या हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.या कारवाईमुळे परिसरातील मोबाईल टॉवर चोरी प्रकरणी मोठा धागा लागला असून पोलिसांच्या दक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी पो.उप.निरीक्षक गणेश देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने हद्दीमध्ये गस्त घालत असताना जिशान जमीन मलिक (वय ३३, रा.गाझीनगर काटवन खंडोबा) हा इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला.त्याला चौकशीअंती ताब्यात घेतले असता त्याच्याकडे मोबाईल टॉवरमध्ये वापरल्या जाणाऱ्या १२ बॅटऱ्या आढळून आल्या. त्यांची किंमत तब्बल 4 लाख 80,000/- रु.एवढी असल्याचे निष्पन्न झाले.चोरी संदर्भात विचारणा केली असता आरोपी समर्पक उत्तर देऊ न शकल्याने त्याच्यावर गु.र.नं. 1092/2025 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील चौकशीमध्ये आरोपीने राहुल जगन्नाथ पवन व सागर रामदास भोस या दोघांकडून बॅटऱ्या ठेवण्यासाठी मिळाल्याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर बॅटऱ्या बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली.त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.निरीक्षक गणेश देशमुख,पोहेकॉ.बाळकृष्ण दौंड,वसीम पठाण,साबीर शेख, पो.ना.विजय ठोंबरे,पोकॉ.दिपक रोहकले,अमोल गाडे,शिरीष तरटे, सुरज कदम,पोकॉ.सत्यम शिंदे, राम हंडाळ,सचिन लोळगे,अतुल काजळे,संकेत धिवर,अतुल लाटे यांनी केली आहे.

No comments