समाजकार्य महाविद्यालय चोपड्याच्या ग्रामीण शिबिराअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भग...
समाजकार्य महाविद्यालय चोपड्याच्या ग्रामीण शिबिराअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा यांचे प्रथम वर्ष समाजकार्य स्नातक व प्रथम वर्ष समाजकार्य पारंगत या वर्गातील विद्यार्थ्यांचे हिवाळी ग्रामीण शिबीर धनाजी नाना प्राथमिक आणि डी आर बी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सत्रासेन ता. चोपडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरा दरम्यान आरोग्य तपासणी करून शिबिरार्थींना आरोग्यपर मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सत्रासेन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अमित देसले आणि मामले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. मयूर सोनवणे यांच्या मार्गदर्शन तथा सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात ग्रामीण हिवाळी शिबिरात सहभागी शिबिरार्थींचे आणि सत्रासेन येथील आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मधुमेह आणि रक्तदाब तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून प्रा.डॉ.मारोती गायकवाड यांनी आरोग्याचे महत्त्व सांगत शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. शिबिरार्थी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी आणि रोगमुक्त जीवन या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण विषयावर मोलाचे मार्गदर्शन डॉ.सोनवणे आणि डॉ. देसले यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामीण शिबिराचे संयोजक प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.मोहिनी उपासनी यांनी परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक वसंत बारेला, आरोग्य सेविका श्रीमती उषा पावरा, आशा वर्कर सोनी भादले, ममता भादले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रेरणा धनगर यांनी केले. आभार प्रदर्शन वर्षाराणी गायकवाड यांनी केले.



No comments