राज्यस्तरीय तापी पूर्णा आदर्श शिक्षक पुरस्काराने जे.ई.स्कूल मुक्ताईनगर चे शिक्षक शिवाजीराव वंजारीसर सन्मानीत प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर ...
राज्यस्तरीय तापी पूर्णा आदर्श शिक्षक पुरस्काराने जे.ई.स्कूल मुक्ताईनगर चे शिक्षक शिवाजीराव वंजारीसर सन्मानीत
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर आयोजित राज्यस्तरीय तापी पुर्णा आदर्श शिक्षक पुरस्कारांने जे.ई.स्कूल मुक्ताईनगर शाळेतील शिक्षक शिवाजीराव भागवत वंजारीसर यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष "आई मला जन्म घेऊ दे"
या प्रसिद्ध अशा कवितेचे कवी , साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे सर यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवचरण उज्जैनकर व राज्यस्तरावरील सर्व पदाधिकारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती राणे तसेच विनायक वाडेकर सर यांनी केले. यावेळी राज्यभरातील शिक्षक तसेच सर्व क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते.

No comments