adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल ते भुसावळ रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, शिवसेना शिंदे गटाची मागणी

यावल ते भुसावळ रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा,  शिवसेना शिंदे गटाची मागणी    यावल प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथिल रहि...

यावल ते भुसावळ रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा,  शिवसेना शिंदे गटाची मागणी  


यावल प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथिल रहिवासी तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन श्रावण सोनार यांनी  नुकतेच सार्वजनिक बांधकाम  विभाग यावल  यांच्याकडे दिले निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल भुसावळ रस्ता हा अत्यंत खराब झालेला असुन रोज नेहमी या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात. मागील ५-६ महिन्यापासुन १० ते १२ जणांचा  मृत्यु झालेला आहे. मागील ३-४ महिन्यापुर्वी औरंगाबाद खंडपीठाने आपल्या कार्यालयाविरुध्द गंभीर असे ताशेरे ओढलेले आहे. त्यांनी म्हटले आहे की ज्या रस्त्यावरती अपघात होतील त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना धरण्यात येईल आणि जखमी झालेल्या रुग्णांवरती सुध्दा आपल्या पगारातुन कपात करण्यात येईल याकरीता रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आपल्या विरुध्द शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे शिवसेना गटाचे नितीन सोनार यांनी दिला आहे.

No comments