adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरपंच संवाद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली प्रशिक्षणासाठी लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम तडवी यांची निवड

  सरपंच संवाद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली प्रशिक्षणासाठी लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम तडवी यांची निवड  आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मोहरद...

 सरपंच संवाद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया दिल्ली प्रशिक्षणासाठी लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम तडवी यांची निवड 

आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या मोहरद च्या प्रथम महिला सरपंचांना मिळाला बहुमान  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव सरपंच शक्ती सरपंच संवाद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे आयोजित चार दिवसीय प्रशिक्षणासाठी  जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मोहरद  गावातील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम तडवी यांची दिल्ली या ठिकाणी प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे येणाऱ्या 16 ते 19 डिसेंबर पर्यंत दिल्ली येथे होणाऱ्या सरपंच शक्ती महिला सरपंच प्रशिक्षण शिबिरामध्ये महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून चोपडा तालुक्यातील मोहरत ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम रमजान तडवी यांची निवड झालेली आहे याकरिता संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे संपूर्ण देशभरातून 50 महिला सरपंच यांची या प्रशिक्षणासाठी निवड झालेली आहे आपल्या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर कसे पुढे नेता येईल आणि सरपंच संवाद उपक्रमाद्वारे उपलब्ध असलेल्या संधीचा प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल यासाठी खास परिचय सत्र आयोजित करण्यात आले आहे सरपंच संवाद उपक्रमाद्वारे देशातील सरपंचांना भक्कम साथ देऊन ग्रामविकास अधिक सक्षम करण्यासाठी करण्याची गरज तसेच या सत्रात सरपंच संवाद प्रभावी शासन आगामी विकासासाठी सरपंचांना कसे मदत होईल यावर भर देण्यात आला आहे चार दिवसीय निवासी प्रशिक्षणात मुख्य आकर्षण म्हणजे अनुभव आधारित ट्रेनिंग संसद भवन व गती शक्ती संग्रहालय भ्रमण महिला विकासासाठी असलेल्या योजनांची माहिती केंद्रीय मंत्री व राजनेता यांच्याशी संवाद अशा प्रकारे चार दिवसीय सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे *लोकनियुक्त सरपंच सौ अंजुम तडवी*  ग्राम विकास आणि पंचायत राज यामध्ये आपल्या ग्रामपंचायत मध्ये महिलांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात आहे त्याचबरोबर महिला सशक्तिकरण करिता लगातार अभियान चालवले जात आहेत हे सरपंच संवाद शिबिरा महिला सशक्तिकरण आणि त्यांचा सर्वांगीण विकासासाठी असून निश्चितपणे या शिबिरातून बरी कशी माहिती शशक्तीकरण आणि विकासाच्या योजना याबद्दलची माहिती मिळवून माझ्या पंचायतीच्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल तसेच मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात पंचायतचे पार्लमेंट या कार्यक्रमात माझी दिल्ली या ठिकाणी निवड झाली होती आणि आता दुसऱ्यांदा दिल्ली या ठिकाणी निवड झाली आहे ही गोष्ट खूप अभिमान व आनंदाची आहे आमच्यासाठी व आमच्या परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले 

[हाजी रमजान साहेब: पंचायत समिती चोपडाचे गटविकास अधिकारी श्री एन आर पाटील साहेब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनाल करणवाल मॅडम ग्रामविकास अधिकारी श्री पंकज चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभले]

No comments