adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ. तु.ल.कोळंबे शाळेची शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न

 सौ. तु.ल.कोळंबे शाळेची शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -;- हेमकांत गायकवाड)  मुक्ताईनगर तालुका एज्यु...

 सौ. तु.ल.कोळंबे शाळेची शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -;- हेमकांत गायकवाड)

 मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित सौ.तु.ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर व सेमी विभाग ची दिनांक 6 डिसेंबर शनिवार रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.तसेच मराठी विभागाची दिनांक 21 नोव्हेंबर रोजी आयोजन केले होते. मराठी विभागाची सहल अजिंठा,सोनबर्डी, गोद्री या ठिकाणी नेण्यात आली होती तर, सेमी विभागाची सहल वेरूळ, घृष्णेश्वर, दौलताबाद, सिद्धार्थ गार्डन,बीबी का मकबरा या ठिकाणी नेण्याचे आयोजिले होते. विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती व कला यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा. या हेतूने नियोजन करून राबविण्यात आली. ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्यात आली. सहलीचे बस पूजन स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भाऊ महाजन, संस्थेचे सेक्रेटरी श्री.सी.एस. चौधरी व मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे यांच्या उपस्थितीत करून रवाना झाली. मराठी विभागाची शैक्षणिक सहलीसाठी श्रीमती वंदना भालशंकर, श्रीमती सुरेखा मुंडके, श्री सचिन वराडे,श्री निलेश कळसकर यांनी सहकार्य करून सहल यशस्वीपणे पार पाडली तर,सेमी विभागाची शैक्षणिक सहल श्रीमती आशा कोळी, श्री मनोज राठोड श्रीमती प्रणिता चौधरी व श्री सागर मुंडके यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडली.एस.टी. महामंडळाचे चालक श्री.एस.पी.नारखेडे यांनी सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक सेवा पुरवली.

No comments