adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रताप विद्या मंदिराची यशोपताका कायम... प्रताप शाळेचे उपशिक्षक पंकज शिंदे यांची राज्यस्तरावर निवड...

  प्रताप विद्या मंदिराची यशोपताका कायम...   प्रताप शाळेचे उपशिक्षक पंकज शिंदे यांची राज्यस्तरावर निवड...  विश्राम तेले चौगाव : (संपादक -:- ह...

 प्रताप विद्या मंदिराची यशोपताका कायम... 

 प्रताप शाळेचे उपशिक्षक पंकज शिंदे यांची राज्यस्तरावर निवड... 


विश्राम तेले चौगाव :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्था , नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी आयोजित  विभागस्तरीय(नाशिक विभाग) युक्तिवाद : प्रतिवाद (वादविवाद) स्पर्धेत प्रताप विद्या मंदिर, चोपडा येथील उपशिक्षक तथा दुर्गसेवक पंकज प्र शिंदे यांनी विभागस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तत्पूर्वी तालुकास्तरावरील वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी नंदुरबार येथे आयोजित वादविवाद स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व केले होते. जळगाव,धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांच्या सर्व तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांसाठी आयोजित विभागस्तरीय स्पर्धेत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे योग्य की अयोग्य ?  या विषयावर युक्तिवाद करत हे यश मिळवले.

            विभागस्तरावरील या यशामुळे आता पंकज शिंदे यांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेसाठी सार्थ निवड झाली आहे.

       या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष मा.शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष मा.विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन मा.राजाभाई मयूर, सचिव मा.माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य मा.सौ उर्मिलाबेन गुजराथी, मा.चंद्रहासभाई गुजराथी , मा.भूपेंद्रभाई गुजराथी, मा.रमेशकाका जैन तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी , उपमुख्याध्यापिका श्रीमती एम डब्ल्यू पाटील, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक ए एन भट, एस व्ही करमरकर, पी ए नागपुरे, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

***************************

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD) साधण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना सादर करण्यासाठी राज्यस्तरीय मंच यावेळी परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. यशस्वी गुणवंत शिक्षकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

No comments