काँग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त कस्तुरबा विद्यालयात ध्वजारोहण नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उप...
काँग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त कस्तुरबा विद्यालयात ध्वजारोहण
नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त कस्तुरबा माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहण नवनिर्वाचित नगरसेवक श्री. रमाकांत ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रमाकांत ठाकूर, नगरसेविका सौ. वंदना पाटील, नगरसेविका सौ. वंदना बाविस्कर व नगरसेवक अमोल पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब सुरेश सिताराम पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष काँग्रेस नंदकिशोर सांगोरे, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, चो.सा.का. संचालक गोपाल धनगर, मधुकर बाविस्कर, राजेंद्र पाटील, माणिक पाटील, सुधाकर बाविस्कर, लक्ष्मण कावीरे, डॉ. अशोक कदम, बाळकृष्ण पाटील, अनिल पाटील, एम. एन. शिंदे, देविदास साळुंखे, भरत पाटील, तापी सूतगिरणी संचालक देविदास सोनवणे, रमाकांत सोनवणे, यशवंत खैरनार, शांताराम लोहार, दिनेश अहिरे, उमाकांत निकम, प्रताप सोनवणे, अशोक पाटील, इलियास पटेल, हेमराज पाटील, देवकांत चौधरी, प्रवीण पाटील, युवराज पाटील, अविनाश धनगर, राकेश ठाकूर, के. आर. वाघ, मोहन पाटील, विक्रम पाटील, सुमित पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी काँग्रेस पक्षाच्या १४० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करत लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकासासाठी पक्षाची भूमिका अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments