नांदुरा शहरातील भर चौकात मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचा हैदोस; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर नांदुरा प्रतिनिधी : पल्लवी पाटील...
नांदुरा शहरातील भर चौकात मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचा हैदोस; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
नांदुरा प्रतिनिधी : पल्लवी पाटील (खामगाव)
संपादक : हेमकांत गायकवाड
नांदुरा शहरातील प्रमुख चौकांमध्ये मोकाट गुरेढोरे जनावरे तसेच भटक्या श्वानांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः बाहेरच्या शहरातून मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांना नांदुरा शहरात सोडण्यात आल्याने मुख्य चौकांमध्ये श्वानांचा हैदोस वाढला असून नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. यासोबतच शहरातील चौकांमध्ये बेशिस्तपणे दुचाकी, ऑटो रिक्षा व इतर वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर प्रकाराकडे नांदुरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असून, शहरातील नागरिकांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. नांदुरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच पोलिस प्रशासनाने बेशिस्त वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी जनहितार्थ मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा पेठकर पाटील, ज्येष्ठ पत्रकार तथा स्वाभिमानी शिव संदेशचे मुख्य संपादक यांनी केली आहे.

No comments