adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

“मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती व अस्मितेचे प्रतीक आहे:- प्रा. रामेश्वर निंबाळकर

“मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती व अस्मितेचे प्रतीक आहे:- प्रा. रामेश्वर निंबाळकर    भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संप...

“मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती व अस्मितेचे प्रतीक आहे:- प्रा. रामेश्वर निंबाळकर  


 भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह-समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत एक व्याख्यान संपन्न झाले.“मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक विजय” या विषयावर मराठी विभागातील प्रा. रामेश्वर निंबाळकर यांनी सखोल व अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गायकवाड व प्रा. एम. डी. खैरनार उपस्थित होते.आपल्या व्याख्यानात प्रा. निंबाळकर यांनी मराठी भाषेचा ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रवास प्रभावीपणे मांडला. ते म्हणाले की, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती व अस्मितेचे प्रतीक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही ऐतिहासिक घटना असून भाषेचे प्राचीनत्व, स्वयंभूपणा आणि साहित्यातील सलगता हे सर्व निकष मराठी भाषेने समर्थपणे पूर्ण केले आहेत.”

मराठी भाषेला १५०० ते २००० वर्षांहून अधिक प्राचीन इतिहास असून गाथासप्तशती पासून ते आधुनिक साहित्यापर्यंत तिची परंपरा अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून सुरू झालेली ही साहित्यपरंपरा आज जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे, असे त्यांनी नमूद केले. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार असून विद्यापीठांमध्ये विशेष अध्यासने सुरू होतील व प्राचीन ग्रंथांच्या संवर्धनाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे यांनी मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अभिमानाने वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कोष्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. इमरान खान यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.

No comments