संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री कैलास गोरे पाटील साहेब व त्यांच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी मा. श्री काकाणी साहेब य...
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री कैलास गोरे पाटील साहेब व त्यांच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी मा. श्री काकाणी साहेब यांच्यासोबत बैठक संपन्न
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक २२ डिसेंबर रोजी मुंबई येथे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री कैलास गोरे पाटील साहेब व त्यांच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी मा. श्री काकाणी साहेब यांच्यासोबत सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान साहेबांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचना (Guidelines) असून, ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक झालेले आहे, त्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत घेता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. या परिस्थितीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तसेच संबंधित प्रशासकीय कामकाज थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या विषयावर सुप्रीम कोर्टात दाद मागणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
चर्चेदरम्यान असेही स्पष्ट झाले की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त झालेले आरक्षण कमी करण्यासाठी ओबीसींच्या काही जागा लकी ड्रॉ पद्धतीने कमी करण्यात येऊ शकतात, किंवा ओबीसी व इतर जागांचे आरक्षण पुन्हा नव्याने काढण्यात येऊ शकते, अशा शक्यता सध्या विचाराधीन आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जळगाव येथून संघटनेचे राज्य पदाधिकारी मा. श्री प्रभाकर आप्पा सोनवणे साहेब व मा. श्री नानाभाऊ महाजन साहेब विशेष उपस्थित होते. या संपूर्ण विषयावर पुढील दिशा व निर्णय निश्चित करण्यासाठी लवकरच राज्य कोअर कमिटी व इतर सदस्यांसाठी Google Meet द्वारे बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

No comments