adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शैक्षणिक व्यासपीठाच्या आंदोलनानंतरही शिक्षण विभागाची उदासीनताच पुढे

शैक्षणिक व्यासपीठाच्या आंदोलनानंतरही  शिक्षण विभागाची उदासीनताच पुढे इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील शिक्षण वि...

शैक्षणिक व्यासपीठाच्या आंदोलनानंतरही  शिक्षण विभागाची उदासीनताच पुढे

इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

न्हावी येथील शिक्षण विभागाच्या अडवणूकीच्या कारभाराविरुध्द शैक्षणिक व्यासपीठाने शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांचे कार्यालयासमोर साखळी उपोषण आयोजित केले होते. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी मागितलेली माहिती ४ दिवसात देण्यात येईल व सात दिवसांत मिटींग लावण्यात येईल असे आश्वासन शैक्षणिक व्यासपीठास देण्यात आले होते व म्हणून साखळी उपोषण स्थगित करण्यात आले होते. कार्यालयाने अपूर्ण माहिती दिली आहे.तसेच सभा देखील आयोजित केलेली नाही. कार्यालयातील दप्तर दिरंगाई कायम आहे. सह्यांच्या अधिकारासाठी वारंवार हेलपाटे घालावे लागतात. ४ ऑक्टोबरला दिलेला प्रस्ताव प्रचंड पाठपुराव्यानंतर आज २६ डिसेंबर ला मंजूर करण्यात आला. यामुळे त्या शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत.परिणामी सर्व कर्जाचे हप्ते थांबलेले आहे. पगार नसल्याने सोसायटीचेही कर्ज त्यांना मिळत नाही. केवळ शिक्षण विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळेच हे होत आहे. सोमवारी संघटनेचे प्रतिनिधी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देणार असून स्थगित केलेले साखळी उपोषण आंदोलन पुन्हा करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे सेक्रेटरी एस्.डी.भिरुड यांनी दिला आहे..

No comments