वाशिम मधील आंबेडकर अनुयायी यांच्याकडून मनुस्मृती दिन मनुस्मृती जाळून साजरा वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वाशिम मधील आंबे...
वाशिम मधील आंबेडकर अनुयायी यांच्याकडून मनुस्मृती दिन मनुस्मृती जाळून साजरा
वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाशिम मधील आंबेडकर अनुयायी यांच्याकडून मनुस्मृती दिन मनुस्मृती जाळून साजरा करण्यात आला. या बाबतीत अधिक माहिती अशी की जगभरात मनुस्मृती दहन दिन साजरा केला जातो कारण याच २५ डिसेंबर१९२७ रोजी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड रायगड येथे मनुस्मृती जाळून जातीय भेदभाव आणि विषमतेचा निषेध केला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी या दिनानिमित्त मनुस्मृती प्रतीकात्मकरीत्या जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात
जे सामाजिक न्याय आणि समानतेच्या लढ्याचे प्रतीक आहे. याचाच एक भाग म्हणुन दिनांक २५ डिसेंबर 2025 रोजी वाशिम मधील ऑल इंडिया ब्लू टायगर सेना यांच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या मनुस्मृती दिनानिमित मनुस्मृती दहन करण्यात आले.कारण हा दिवस केवळ भूतकाळातील घटनेचे स्मरण नसून, आजही समाजात असलेल्या जातीय आणि लैंगिक विषमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी आणि समानतेच्या लढ्याला नवी ऊर्जा देण्यासाठी महत्त्वाचा असतो . म्हणुन आज मनुस्मृतीला जाळून नवीन भविष्यात येणाऱ्या पिढीला एक संदेश दिला आला.या मनुस्मृती मध्ये लहानपणी मुलीनं तिच्या वडिलांच्या छत्राखाली असावं, लग्नानंतर पतीच्या, पतीचं निधन झाल्यानंतर तिनं तिच्या मुलांच्या कृपेवर राहावं. पण कोणत्याही परिस्थिती महिलेनं स्वतंत्र असू नये," मनुस्मृतीच्या पाचव्या अध्यायात अशा अर्थाचा 148 वा श्लोक आहे. महिलांच्या बाबतीत मनुस्मृती काय सांगते हे या श्लोकावरून स्पष्ट होतं. म्हणुन स्त्रियांना स्वतंत्र मनुस्मृतीने नाकारले होते. या कारणाने विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते.सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.अथक प्रयत्नाने भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून संविधान तयार केले. याचाच एक भाग म्हणून आज रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेना चे संस्थापक अध्यक्ष जगदिश मानवतकर, अखिल भारतीय मातंग संघाचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष संजय वैरागडे, मयुर मानधने, ऑल इंडिया ब्लू टायगर सेना चे विदर्भ अधीक्षक संविधान ढोले, ऑल इंडिया ब्लू टायगर सेना चे वाशिम ता.अध्यक्ष (आतिश वैरागडे), ता. उपाध्यक्ष गोलू वानखडे जिल्हा महासचिव, दिलीप सरकटे (तालुका सचिव), मातंग समाज युवा नेते पवन सुतार, रामदास कालापाड यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.


No comments