मलकापूर तहसीलच्या कारभाराला नवे पर्व; तहसीलदार समाधान सोनोवने यांनी स्वीकारला पदभार प्रहार जनशक्ती पक्षाकडून सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव ...
मलकापूर तहसीलच्या कारभाराला नवे पर्व; तहसीलदार समाधान सोनोवने यांनी स्वीकारला पदभार
प्रहार जनशक्ती पक्षाकडून सत्कार व शुभेच्छांचा वर्षाव
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर तहसीलच्या प्रशासकीय कारभाराला नवी दिशा मिळणार असून नवनियुक्त तहसीलदार समाधान सोनोवने यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या पदभार स्वीकृतीनंतर तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा पत्रकार अजय टप यांनी तहसीलदार समाधान सोनोवने यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
तहसीलदार समाधान सोनोवने हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात असून मलकापूर तालुक्यातील शेतकरी, सामान्य नागरिक, महिला व दुर्बल घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व गतिमान प्रशासन राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे, अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन, शेतकरी प्रश्न तसेच जनतेच्या तक्रारींवर तातडीने निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना अजय टप म्हणाले, “मलकापूर तालुक्याला सक्षम व संवेदनशील प्रशासनाची नितांत गरज आहे. तहसीलदार समाधान सोनोवने यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांना न्याय मिळेल आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख बनेल, अशी अपेक्षा आहे.” या शुभेच्छा भेटीमुळे तहसील कार्यालय परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून मलकापूरकरांमध्ये नव्या तहसीलदारांकडून विकासाभिमुख व न्याय्य कारभाराची आशा बळावली आहे.

No comments