adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न

सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न  भरत कोळी यावल ता.प्रतिनिध...

सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम संपन्न

  दि . ६ डिसेंबर २०२५ रोजी सरदार वल्लभ भाई इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम स्कूल यावल मध्ये शाळेचे अध्यक्ष डॉ . प्रदीप माहेश्वरी सर यांच्या अध्यक्षतेखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शीला मॅडम यांच्या उपस्थितीत महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण  दिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले .

प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .शीला तायडे मॅडम यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी उत्कर्ष भालेराव याने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घडलेली गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली व शीला तायडे मॅडम यांनी गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त अशी प्रेरणा दिली. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

No comments