प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी नांदेडमध्ये आवळल्या मुसक्या! पुणेच्या आंबेगाव पोलिसांची कामगिरी! (पुणे जिल्हा...
प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी नांदेडमध्ये आवळल्या मुसक्या! पुणेच्या आंबेगाव पोलिसांची कामगिरी!
(पुणे जिल्हा ) संभाजी पुरी गोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नात्यातील मुलीशी असलेल्या प्रेम प्रकरणाच्या वादांतून तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये जावेद ख्वाजामियां पठाण (वय 34) रा. ख्वाजानगर शनी मंदिराजवळ भोकर जि.नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत जावेदचा भाऊ रौफ उस्मान शेख (वय 35) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबाबत संदीप रंगराव भुरके (वय 25) त्याच्यासह एका साथीदारांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून जावेद हा पुण्यात एका ठिकाणी काम करत होता त्याचवेळी आरोपी संदीप भुरके यांच्या नात्यातील एका मुलीशी त्याची ओळख झाली होती. आणि ओळखीचे रूपांतर हे प्रेम संबंधात झाले, मात्र या प्रेमप्रकरणाला आरोपी संदीप भुरके याचा चांगलाच विरोध होता. वारंवार तो प्रेमसंबंध तोड असे जावेदला सांगत होता, आणि याच वादांतून संदीप भुरके यांनी आपल्या साथीदारासमवेत जावेदवर धारदार शस्त्राने वार केले यात जावेद पठाण हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान जावेदचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास आंबेगाव पोलीस करत होते. याबाबत आंबेगाव पोलिसांना खून करणारे आरोपी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना तपासाच्या दृष्टिकोनांतून सूचना केल्या. याच दरम्यान आंबेगाव पोलिसांच्या पथकांने नांदेडमध्ये जावुन अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या, यामध्ये आरोपी नामे. संदीप रंगराव भुरके (वय 25) आणि त्याचा साथीदार आरोपी नामे.ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन (वय 20) दोघेही मूळचे नांदेडचे आहेत. सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार सहा. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने गुन्हे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर शैलेंद्र साठे चेतन गोरे हनुमंत पिसाळ निलेश जमदाडे हरीश गायकवाड धनाजी धोत्रे सचिन गाडे प्रमोद भोसले योगेश जगदाळे शिवाजी पाटोळे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments