adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सनपुले आश्रमशाळेत आदिवासी भजन संध्या कार्यक्रम;पालकांनीच गायले भक्तिगीते

 सनपुले आश्रमशाळेत आदिवासी भजन संध्या कार्यक्रम;पालकांनीच गायले भक्तिगीते  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- महाराष्ट्र श...

 सनपुले आश्रमशाळेत आदिवासी भजन संध्या कार्यक्रम;पालकांनीच गायले भक्तिगीते 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व आश्रमशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमधून नवनवीन उपक्रम राबवले जातात.जेणेकरून फक्त नोकरी मिळविण्याच्या हेतूने शिक्षण घेणारे विद्यार्थी शिकून बाहेर न पडता जागृत नागरिक व आत्मबल असणारे मुलं शाळेत तयार व्हावे.शासनाच्या असाच मानस असतो.शिक्षण ही एकांगी  प्रक्रिया नसून अनेक घटक त्याला साथ आणि सोबत घालत असतात.तरच परिपूर्ण नागरिक घडत असतो.विद्यार्थी हा शिक्षण घेताना त्याला पालकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.आदिवासी आश्रमशाळा ह्या निवासी असल्याने पालकांपासून हे विद्यार्थी लांब राहून शिक्षण घेत असतात या गोष्टी हेरून चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा सनपुले येथील उच्च माध्यमिक उपशिक्षक मिलिंद पाटील यांनी आदिवासी पालकांशी संपर्क करून  त्यांच्यातील काही भजनी मंडळी शाळेत बोलवून भजन संध्या कार्यक्रम आयोजित केला होता.

दिनांक २७ वार शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजता ही भजन संध्या आयोजित करण्यात आली होती.यात तबला,डफली,संगीत पेटी,झांजर,चिमटा,खूळखूळे आदी साहित्याचा वापर करत आपल्या आदिवासी बोली भाषेत विविध भजने त्यांनी सादर केली. संगीत मैफिलीने अनेक विद्यार्थी तल्लीन होऊन भजनात रममान झाले होते.दैनंदिन अभ्यासाव्यतिरिक्त शाळेने राबवलेल्या उपक्रमातून मनाला एक वेगळा आनंद मिळाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी एवढी बोलून दाखवली. हाती असलेल्या गोष्टीत समाधान मानण्याची प्रक्रिया अध्यात्मातून व भजनातून अंगी भिनते व यातून आत्मबल वाढते. भविष्यात असे व्यासंगी व्यक्तिमत्व आत्महत्येपासून दूर राहते.हा उपक्रम योग्य असल्याची भावना मुख्याध्यापक यांनी देखील व्यक्त केली. उपशिक्षक सागर पवार व मच्छिंद्र चौधरी यांनी मेहनत घेतली.

No comments