adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्डी येथील अविनाश शिंदे यांचा गटविकास अधिकारी यांना निवेदनद्वारें विकास कामांची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

 वर्डी येथील अविनाश शिंदे यांचा गटविकास अधिकारी यांना  निवेदनद्वारें विकास कामांची चौकशी  न झाल्यास उपोषणाचा इशारा प्रतिनिधि रविन्द्र कोळी  ...

 वर्डी येथील अविनाश शिंदे यांचा गटविकास अधिकारी यांना  निवेदनद्वारें विकास कामांची चौकशी  न झाल्यास उपोषणाचा इशारा


प्रतिनिधि रविन्द्र कोळी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वर्डी ता. चोपडा : वर्डी येथील झालेल्या विकास कामांची चौकशी न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा येथील रहिवासी अविनाश शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

वर्डी येथील रहिवासी अविनाश चुडामन शिंदे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे ५ सप्टेंबर रोजी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती, पंधरावा वित्त आयोगाच्या व दलित वस्तीसाठी झालेल्या कामाचा निधी खर्च मागितला असता, ज्या ठिकाणी कामे झाली आहे व खर्च निधी झाला त्या

ठिकाणी मात्र काम झालेले दिसत नाही. तसेच गटारी, ढापे, गाव हाळ काँक्रिटीकरण निष्कृष्ट झाले असून इस्टिमेटनुसार कामे झालेच नाही. परंतु, या कामांचे परस्पर पैसे काढले आहेत, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. दरम्यान, मार्च २०२२ ते जून २०२५चे तत्कालीन

सरपंच व ग्रामसेवक यांनी मनमानी क पदाचा गैरवापर करून प्रोसिडिंगनुसान एकही काम केलेले नाही. तसेच केलेल्या कामाचे अवाजवी अर्थात जास्त बिले काढण्यात आली आहेत या संदर्भात केलेल्या तक्रारीनुसान सर्व बाबींच्या विचार करून प्रत्यक्ष स्थळ पहाणी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह २२ डिसेंबरपर्यंत चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाला बसू, अस इशारा तक्रारदार अविनाश शिंदे यांनी ५ सप्टेंबर रोजी गट विकास अधिकारी यांच्यांकडे दिलेल्य निवेदनातून दिला आहे. तर आता अधिकारी या संदर्भात काय चौकशी करतात, याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष् लागून आहे.

No comments