रात्रगस्त घालताना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्याचे निधन ! बीड जिल्ह्यात शासकीय मानवंदना देवुन जड अंतःकरणाने अखेरचा निरोप! स...
रात्रगस्त घालताना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात पोलीस कर्मचाऱ्याचे निधन ! बीड जिल्ह्यात शासकीय मानवंदना देवुन जड अंतःकरणाने अखेरचा निरोप!
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील कर्जत पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सुदाम राजू पोकळे (वय 29) मूळ रा. चिंचाळा ता. आष्टी जि. बीड) यांचे राशन करमाळा रस्त्यावर रात्रगस्त घालताना 29 डिसेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास अपघाती निधन झाले आहे. मयत सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्याअंतर्गत असलेला राशीन पोलीस चौकी येथे कर्तव्यावर होते. 18 डिसेंबरला त्यांची रात्रगस्तीसाठी ड्युटी होती. पहाटे 2च्या सुमारांस पोकळे हे पायी रस्ता पास करीत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका पिकअप वाहनाने त्यांना जोरदाची धडक दिली. यात ते पोकळे हे गंभीर जखमी होवुन जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुदाम पोकळे हे मूळचे बीड जिल्हा आष्टी तालुक्यांतील चिंचाळा-देसुर गावचे सुपुत्र होते. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस तसेच चिंचाळा गावातील अनेक जण तेथे गेले होते. कर्जत ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर 19 डिसेंबर रोजी त्यांच्यावर त्यांच्यामुळे मुळगावी चिंचाळा येथे शासकीय इतमामात मानवंदना देवुन पोकळे यांना जड अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस कर्मचारी सुदाम पोकळे यांच्या पश्चांत आई वडील पत्नी आणि पाच वर्षाची मुलगी असा परिवार आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी सुदाम राजू पोकळे यांचा रात्री कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत वेदनादायक आहे. या शूर जवानाच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर पोलीस आणि पोकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच चिंचाळा गाव, आष्टी तालुका संपूर्ण पोलीस दल शोकाकुल झाले आहे. अशा शब्दांत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. अपघात घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे आणि पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी घटनास्थळी भेट दिली.

No comments