adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय ! २० नगरसेवकांसह नगराध्यक्षपदावरही काँग्रेसची घवघवीत मुसंडी

  श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय ! २० नगरसेवकांसह नगराध्यक्षपदावरही काँग्रेसची घवघवीत मुसंडी  शौकतभाई शेख / श्रीरामपू...

 श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय !

२० नगरसेवकांसह नगराध्यक्षपदावरही काँग्रेसची घवघवीत मुसंडी 


शौकतभाई शेख / श्रीरामपूर:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा राजकीय विजय संपादन करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या तब्बल २० नगरसेवकांची निवड करून स्पष्ट बहुमत मिळवून दिले असून नगराध्यक्षपदावरही काँग्रेसच्या उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

श्रीरामपूर नगर परिषदेच्या एकूण ३४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत

काँग्रेस – २०

भारतीय जनता पार्टी – १०

शिवसेना (शिंदे गट) – ३

अपक्ष – १ असा निकाल लागला आहे. बहुमताच्या जोरावर काँग्रेसने नगराध्यक्षपदावरही आपला झेंडा फडकावला आहे.

श्रीरामपूर हे शहर पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती या निवडणुकीत पुन्हा एकदा आली आहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवडून आलेले करण जयंत ससाणे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, यापूर्वी ते श्रीरामपूर नगर परिषदेत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मातोश्री राजश्री जयंत ससाणे यांनी काँग्रेसकडून सलग दोन टर्म श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांचे वडील स्वर्गीय जयंत मुरलीधर ससाणे हे शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले आहेत.

याचबरोबर करण ससाणे यांच्या पत्नी सौ.दिपाली करण ससाणे या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

ससाणे कुटुंबाची काँग्रेस पक्षाशी असलेली दीर्घकालीन निष्ठा, सामाजिक कार्यातील सहभाग आणि जनतेमध्ये निर्माण झालेला विश्वास यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास टाकला आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील मतदार अमनप्रिय व सुज्ञ असल्याने येथे काँग्रेसची परंपरागत विजयी परंपरा आजही कायम राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments