फैजपूर नगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या दामिनी सराफ विजयी तर भाजपाचे ६ काँग्रेस ४ राष्ट्रवादी २ अपक्ष ३ एम आय एम १ इदू पिंजारी फ...
फैजपूर नगरपालिकेच्या अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या दामिनी सराफ विजयी तर भाजपाचे ६ काँग्रेस ४ राष्ट्रवादी २ अपक्ष ३ एम आय एम १
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा आज निकाल जाहीर करण्यात आला अटीतटीचा सामना रंगतदार पाहण्यास मिळाला असून नगराध्यक्ष तसेच प्रभागांमध्ये काही प्रभागांमध्ये अटीतटीचा तर काही प्रभागांमध्ये एकतर्फी विजयी तर काही ठिकाणी दारुण पराभव असा निकाल धक्कादायक झाला. नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपाच्या सौ.दामिनी पवन सराफ १० हजार ८७ मते घेऊन विजयी झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार सुमय्या बी शे. कुर्बान यांना ९०५९ एवढी मते मिळाली त्यांचा १०२८ एवढ्या मताने पराभव झाला. फैजपूर शहरात १० प्रभाग निश्चित करण्यात आले होते त्यात २१ नगरसेवक निवडून देण्याचे होते आधीच ५ नगरसेवक बिनविरोध झालेले होते. १६ जागांसाठी अटीतटीची निवडणूक झाली. त्यात भाजपाचे ६ नगरसेवक तर काँग्रेस चे ४ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २ अपक्ष ३ तर एम.आय.एम १ असे एकूण १६ विजयी झाले आहे.
विजयी उमेदवार व (मिळालेली मते)
हकीम एमत तडवी १८३७ (काँग्रेस)
सुमय्या बी शे. कुर्बान १८२७ (राष्ट्रवादी)
शेख सादिका शेख दानिश १५६६(काँग्रेस)
शेख युनूस शेख अय्युब १३९२(एम आय एम)
सफूरा बी शेख महेमूद ६७५ (राष्ट्रवादी)
भारंबे दीपाली जितेंद्र ७३६ (भाजप)
चौधरी विनोद अरुण ९६९ (अपक्ष)
चौधरी जयश्री नरेंद्र ११०३ (भाजप)
इंगळे प्रियांका ईश्वर ८३१ (काँग्रेस)
मडवाले महेंद्र अशोक १४५३ (भाजप)
नेहेते सुनीता अनंत ९९६ (भाजप)
शेख इरफान शेख इकबाल ९९१ (काँग्रेस)
कोळी निकिता प्रकाश १३५६ (भाजप)
गाजरे सूरज रमेश ९४७ (भाजप)
चौधरी अमिता हेमराज ६८१ (अपक्ष)
भारंबे भावना संदीप ५३९ (अपक्ष)

No comments