यावल : वॉर्ड क्रमांक १० मधून नंदाताई महाजनांची थक्क करणारी आघाडी ; १३०० मते मिळवत १०५९ मतांनी विक्रमी विजय या विक्रमी विजयानंतर नंदाताईंना ...
यावल : वॉर्ड क्रमांक १० मधून नंदाताई महाजनांची थक्क करणारी आघाडी; १३०० मते मिळवत १०५९ मतांनी विक्रमी विजय या विक्रमी विजयानंतर नंदाताईंना कोणता खात्याचा कार्यभार मिळणार, याकडे संपूर्ण यावलचे लक्ष लागले आहे
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहराच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये यंदाच्या निवडणुकीत नंदाताई महाजन यांनी अभूतपूर्व विजय मिळवत प्रभावी व्यक्ती म्हणून आपले वर्चस्व अधिक दृढ केले आहे. नंदाताईंना एकूण १३०० मते मिळाली असून त्यांनी तब्बल १०५९ मतांची आघाडी घेत इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक नोंदवला आहे. यावलमध्ये नगराध्यक्ष पदासाठीही सर्वाधिक मते याच वॉर्ड क्रमांक १० मध्ये पडली. त्यामुळे हा वॉर्ड एकप्रकारे विजयाचा केंद्रबिंदू ठरला. नंदाताई महाजन यांचा प्रवास संघर्षमय असून २०११ मध्ये त्या २३ मतांनी पराभूत, तर २०१६ मध्ये केवळ ९ मतांनी पराभूत झाल्या होत्या. या दोन्ही पराभवांनंतरही त्यांनी हार न मानता लोकसंपर्क, महिला बांधणी आणि समाजकार्याचे मोठे काम केले. आज त्याच परिश्रमांचे फलित म्हणून त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळाले.
नंदाताई या यावलमधील मोठा महिला मोर्चा संघटित करणाऱ्या, तसेच शहरात ‘डॅशिंग वुमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची कार्यशैली निर्भय, स्पष्टवक्ती आणि समस्येच्या मुळावर परिणामकारक उपाय शोधणारी असल्याने त्यांना स्थानिक नागरिकांचा मोठा विश्वास आहे. फिअरलेस महिला नेतृत्त्वाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्यांची ओळख मजबूत झाली आहे. महोलना एकजूट करण्यामध्ये आणि वॉर्ड १० मधील मतदारांना एकत्र बांधण्यात नंदाताईंचा हातखंडा आहे. त्या आमदारांच्या विश्वासू महिला नेत्या असून सध्या यावलच्या भाजपा महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. या विक्रमी विजयानंतर नंदाताईंना कोणता खात्याचा कार्यभार मिळणार, याकडे संपूर्ण यावलचे लक्ष लागले आहे. त्यांच्या नेतृत्वाने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments