मलकापूर शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांची भाजपला सोडचिठ्ठी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:-...
मलकापूर शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांची भाजपला सोडचिठ्ठी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणुकीत भाजपाच्या वतीने तिकीट वाटपात सच्चा कार्यकर्त्यांना डावलून चेहरे पाहून व संबंध जोपासीत उमेदवारी दिल्याचा ठपका ठेवित भाजपाचे शहर उपाध्यक्ष अमोल टप यांच्यासह बर्याच पदाधिकारी व पक्षाच्या सदस्यांनी आज २४ डिसेंबर रोजी आपल्या पदासह सक्रीय सदस्यत्वाचे राजीनामे शहराध्यक्ष संतोष बोंबटकार यांच्याकडे दिले. निवणुकीनंतर भाजपामध्ये सुरू झालेल्या या राजीनामा सत्रामुळे भाजपाच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
अमोल टप यांचेसह आदींनी दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, नुकत्याच नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकांमध्ये सक्रीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी देतांना चेहरे पाहून व संबंध जोपासत उमेदवारी देण्यात आली. मी गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करीत होतो. तसेच गत् काळात मी शहरामध्ये पक्षीय वाढीसाठी आवश्यक ते सर्व कामे केली आहेत. तसेच मी राहत असलेल्या प्रभाग क्र.३ मधील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने, मोर्चे काढणे यासह सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले होते. याच अनुषंगाने मी पक्षाकडे प्रभाग क्र.३ अ मधून उमेदवारी मागितली होती. मात्र माझ्या उमेदवारीला डावलून व राजकीय द्वेषभावनेतून मला व माझ्या सहकार्यांना या निवडणुकीतून दूर ठेवण्याचा कुटील डाव पक्षाकडून खेळल्या गेला. मी याच प्रभागातील बुथ क्र.१७० चा बुथ प्रमुख सुध्दा आहे.
पक्षासाठी अहोरात्र झटूनही सच्चा कार्यकर्त्यांना अशाप्रकारे डावलण्यात येते व त्यांच्या कार्याची कोठेही दखल घेतली जात नाही, ही बाब मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार करता व सहकार्यांच्या चर्चेअंती अमोल लक्ष्मणराव टप शहर उपाध्यक्ष भाजपा मलकापूर, राजकुमार वानखेडे शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग भाजपा मलकापूर, सौ.दुर्गा राजकुमार वानखेडे शहर चिटणीस सामाजिक न्याय विभाग भाजपा मलकापूर, अमोल पाटील सदस्य, अमोल मोरे, रोहीत कांडेलकर, पंकज पाटील, सुरज टप, प्रसाद टप, अनेश साखळीकर, विरेंद्र कासे, मंगेश चंदनकार, मयुर बुडुकले, जय वाघमारे, अक्षय लामखेडे, स्वप्नील भिसे आदींनी आपल्या पदाचा व भाजपाच्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे.

No comments