महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ " चे वितरण !... विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव - शहरातील स...
महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक दिनदर्शिका २०२६ " चे वितरण !...
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शाळेचे उपक्रमशील शिक्षक पी डी पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पाटील यांनी शाळेतील मुख्याध्यापक सहकारी शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद यासह सर्व विद्यार्थ्यांना सत्यशोधक समाज संघ निर्मित "सार्वजनिक सत्यधर्म दिनदर्शिका २०२६ " चे वितरण केले. प्रस्ताविकात एचडी माळी यांनी सत्यशोधक दिनदर्शिकाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विस्तृतपणे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पी डी पाटील यांनी आपल्या मनोगत ही दिनदर्शिका विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये सर्व महापुरुष, महामाता, संतांचे जयंती महोत्सव व स्मृतिदिन दिलेले आहेत. यासोबतच महाराष्ट्रातील इतिहास संशोधकांचे, अभ्यासकांचे विविध लेख दिलेले आहेत. महापुरुषांचे अखंड दिलेले आहेत. सत्याचा शोध घेण्यासाठी ही दिनदर्शिका प्रत्येकाने वाचावी यानंतर शाळेच्या वतीने २० गुणांची या दिनदर्शिकेवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली जाणार आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. मुख्याध्यापक पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मुलांनी या दिनदर्शिकेचे वाचन करावे व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एच डी माळी यांनी केले.

No comments