अरुणावती नदी च्या पुलावर संरक्षक कठडे बसवा,सिंचन विहिरींचे देयके द्या शेतकरी सेनेच्या प्रमोद कुदळे यांची मागणी... अमोल बावस्कार बुलढाणा (स...
अरुणावती नदी च्या पुलावर संरक्षक कठडे बसवा,सिंचन विहिरींचे देयके द्या शेतकरी सेनेच्या प्रमोद कुदळे यांची मागणी...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आर्णी:- आर्णीच्या अरुणावती नदी वरील संरक्षक लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताची श्यक्यता असून अरुणावती नदी च्या तीरावर पुरातन महादेव मंदिर,बाबा कंबलपोष दरगाह आहे तसेच उमरखेड,नांदेड,दिग्रस जाण्यासाठी हा जुना पूल अजूनही वापरात येते
आर्णी तालुक्यातील बहुतांश गावे व शेतजमिनी कडे या पुलावरून ये जा करन्यासाठी या पुलाचा वापर होतो फेब्रुवारी महिन्यात भरणाऱ्या उर्स शरीफ ला हजारो भाविक या पुलावरून जातात
म्हणून या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करून पुलावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी शिवसेना प्रणित शेतकरी सेनेचे पश्चिम विदर्भ समनव्ययक प्रमोद कुदळे यांनी एका निवेदमातून कार्यकारी अभियंता यवतमाळ यांना केली आहे तसेच जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून आर्णी तालुक्यातील मनरेगा च्या पूर्ण झालेल्या सिंचन विहिरीचे कुशल देयक देण्या बाबत निवेदन दिले आहे.

No comments