अहिल्यानगर पालिकेत महायुतीचा ‘ब्रेक’! शिंदेसेना स्वतंत्र मैदानात..नगरमध्ये तिरंगी लढत अटळ..शिवसेनेचा ५० जागांवर उमेदवार उभा करणार सचिन मो...
अहिल्यानगर पालिकेत महायुतीचा ‘ब्रेक’! शिंदेसेना स्वतंत्र मैदानात..नगरमध्ये तिरंगी लढत अटळ..शिवसेनेचा ५० जागांवर उमेदवार उभा करणार
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२९):-अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, सत्ताधारी महायुती अखेर फुटली आहे.सन्मानजनक जागा न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी अधिकृतपणे जाहीर केला.या निर्णयामुळे नगरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली असून,आता महानगरपालिकेत तिरंगी लढत अटळ झाली आहे.एकीकडे नगर शहरात महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले असताना,दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.मात्र,या दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.२४ जागांची मागणी, पण तोडगा नाही शिंदे सेनेचा निर्णायक पवित्रा,महायुतीतील जागावाटप चर्चेत शिवसेनेने २४ जागांची स्पष्ट मागणी केली होती. सध्या शिंदे गटाकडे २३ विद्यमान नगरसेवक असून,इतर पक्षातील एक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश केल्याने एकूण २४ माजी नगरसेवक शिंदे सेनेकडे आहेत.
मात्र,आमच्या माजी नगरसेवकांनाही उमेदवारी देण्यास मित्र पक्ष तयार नव्हते, असा आरोप करत शिवसेनेने अखेर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.६८ पैकी ५० जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे करणार असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ६८ पैकी तब्बल ५० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार जाहीर केला आहे.“ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जाईल. जनतेशी थेट संवाद साधत शिवसेना ताकदीने मैदानात उतरणार आहे,” असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत पत्रकार परिषदेत केली.

No comments