फैजपूर जे.टी.महाजन पॉलिटेक्निकमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जे. टी. महाजन पॉलि...
फैजपूर जे.टी.महाजन पॉलिटेक्निकमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा दि. 29 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलच्या मैदानावर संपन्न होणार आहेत. या क्रीडा स्पर्धांचे दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. शरद महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी सहसचिव श्री. शशिकांत चौधरी तसेच प्राचार्य प्रा. पी. एम. राणे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी क्रीडा समन्वयक म्हणून इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. जे. व्ही. बेंडाळे, तर शैक्षणिक समन्वयक व सहकारी संघाचे समन्वयक म्हणून कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. बी. डी. नेमाडे कार्यरत आहेत. यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी सक्रिय सहभाग घेत असून क्रीडा विभागामार्फत नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे.
क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना व क्रीडावृत्ती निर्माण होण्यास मदत होते, असे श्री. शरद महाजन यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या स्पर्धांमध्ये भालाफेक, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, चक्रफेक, क्रिकेट (उपांत्य व अंतिम सामना), रिले रेस, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन (सिंगल), कॅरम व बुद्धिबळ अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दररोज सकाळी वेळेत मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे

No comments