गंभीर बाब..अहिल्यानगर पासपोर्ट घोटाळ्याने जिल्हा हादरला..चौघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल.. फाईल चित्र सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...
गंभीर बाब..अहिल्यानगर पासपोर्ट घोटाळ्याने जिल्हा हादरला..चौघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल.. 
फाईल चित्र
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१७):-शेवगाव तालुक्यातून बनावट नाव,पत्ता व कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने शेवगाव पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,या प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणे येथून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजी चार संशयित बांगलादेशी नागरिकांनी बनावट नावे,पत्ते व कागदपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांना दिले होते.चौकशी दरम्यान निष्पन्न झाले की, संबंधित चारही इसमांनी सन २०१८ मध्ये शेवगाव शहरात सुमारे तीन महिने वास्तव्य करून शासकीय कार्यालयांत भारतीय नागरिक असल्याचा बनावट पत्ता व कागदपत्रे सादर केली होती.चौकशीत त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारा कोणताही वैध पुरावा अथवा साक्षीदार आढळून आला नाही.उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांनी सविस्तर चौकशी करून अहवाल दि.०२ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला.या अहवालाच्या आधारे चारही बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.शुओ कोनक मुस्तुडी – पासपोर्ट क्र. S0437573,राजु सिद्धार्थ चौधरी – पासपोर्ट क्र. S0436971,जेलो प्रियतोश चौधरी – पासपोर्ट क्र. S0456498,प्रकाश सुनिल चौधरी – पासपोर्ट क्र. S1710723 या चौघांनी भारतीय नागरिक असल्याचा बनावट पत्ता व कागदपत्रे सादर करून शासकीय कार्यालयांची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम 420, 465, 468, 471 तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम 1967 चे कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सूचनेनुसार तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल संतोष हरिभाऊ वाघ यांनी केली.या प्रकरणामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवण्याच्या रॅकेटबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून,पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
No comments