भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील मंडळ चहार्डी, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटल चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसा...
भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील मंडळ चहार्डी, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटल चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील मंडळ चहार्डी, यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटल चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब शामराव शिवराम पाटील यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त शिबिर क्रमांक ६ अंतर्गत मोफत दंत व नेत्ररोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० वाजेपर्यंत महादेव मंदिर, झाडण चौक, चहार्डी (ता. चोपडा) येथे होणार आहे. या शिबिरामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती पाटील (MBBS, DOMS) यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकाद्वारे मोफत नेत्र तपासणी, चष्म्याचा नंबर काढणे तसेच काचबिंदू व मोतीबिंदू तपासणी केली जाणार आहे.
तसेच दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. राहुल पाटील व डॉ. महेश्वेता चौधरी यांच्या उपस्थितीत दात व हिरड्यांची तपासणी, लहान मुलांचे दंत उपचार, वाकडे-वेढे दात, तोंडातील छाले, तोंडाचे कर्करोग निदान तसेच रूट कॅनॉल उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्याधुनिक फेको सर्जरी सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे. यशोधन संस्थेच्या २५ वर्षांच्या विश्वास, सेवा, मानवता व बांधिलकीच्या वाटचालीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व यशोधन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments