माळीवाडा बसस्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र चोरी करणारी महिला २४ तासात जेरबंद..!कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आरोप...
माळीवाडा बसस्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र चोरी करणारी महिला २४ तासात जेरबंद..!कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; आरोपीकडून चोरीचे मंगळसूत्र जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२४):-माळीवाडा बसस्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेचा कोतवाली पोलिसांनी अवघ्या २४ तासात शोध घेऊन तिला जेरबंद केले आहे.दि.२४/१२/२०२५ रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरी तसेच माळीवाडा परिसरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांची माहिती घेता गुन्हे शोध पथकातील अधिकारी प्रवीण पाटील व अमलदार यांना आवश्यक आदेश दिले.
कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील माळीवाडा बसस्टँड परिसरात झालेल्या सोनसाखळी चोरीबाबत गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे श्रीरामपूर येथे शोध घेतला.
शोधदरम्यान श्रीरामपूर शहरात माहिती काढून आरोपीच्या घराजवळ सापळा लावून पथकाने संशयित महिला रेखा मधुकर आहेर (वय ४० वर्षे,रा.श्रीरामपूर ता.श्रीरामपूर जि.अहिल्यानगर,) हिला ताब्यात घेतले.
पो.कॉ.रोहिणी दरंदले यांनी ताब्यात घेऊन आरोपीची सखोल व बारकाईने चौकशी केली असता आरोपीने “मी माळीवाडा स्टँड परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे सोन्याचे दागिने चोरी केले आहेत.तसेच मी चोरी केलेले मंगळसूत्र माझ्याच घरातून काढून देते” अशी कबुली दिली.
त्यानुसार आरोपीने चोरी केलेले खालील नमूद वर्णनाचे मंगळसूत्र तिच्या ताब्यातून काढून दिले. त्यानंतर तिला कोतवाली पोलीस ठाण्यात आणून तपासी अमलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सदर गुन्ह्याबाबत पंचनामा ई साक्ष अॅपद्वारे पंचनामा करून कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ११५९/२०२५, बीएनएस २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. १६२० संदीप पितळे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.संभाजी गायकवाड व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पो.कॉ.बाळकृष्ण दोंड,साबीर शेख,विशाल दळवी,विनोद बोरगे, संदीप पितळे,म.पो.कॉ.दरंदले, पोना.अविनाश वाकचौरे,विजय ठोंबरे,पो.कॉ.दीपक रोहकले, सत्यम शिंदे,सूरज कदम,अभय कदम,शिरीष तरटे,अतुल कोतकर,अमोल गाडे,सचिन लोळगे,राम हंडाळ,संकेत धीवर,अतुल शेंडे,अतुल लाटे तसेच मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

No comments