adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण व शिष्यवृत्ती वाटप सोहळा उत्साहात संपन्न

 पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण व शिष्यवृत्ती वाटप सोहळा उत्साहा...

 पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त वार्षिक पारितोषिक वितरण व शिष्यवृत्ती वाटप सोहळा उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

 (संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे परमपूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त भव्य वार्षिक पारितोषिक वितरण व विविध शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर होते.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य श्री. ए. एस. इंगळे सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. ए. काटकर सर, श्री. व्ही. टी. नन्नवरे सर, कार्यालयीन अधीक्षक श्री. नितीन बारी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एस. फेगडे सर तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता अकरावी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाला मंगलमय प्रारंभ झाला. याप्रसंगी उपस्थित शिष्यवृत्ती दाते व पालक वर्गांचे स्वागत करण्यात आले.

इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दात्यांकडून पारितोषिके देण्यात आली.

शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट मॉडेल सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे व रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शिष्यवृत्ती दाते म्हणून उपस्थित आदरणीय रावते सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. एस. फेगडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. माळी मॅडम यांनी केले.

No comments