adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आता नशिराबाद पोलीस ठाणेचा प्रभारी अधिकारी, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला पोलीस अधिकाऱ्याची इंट्री!

 सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आता नशिराबाद पोलीस ठाणेचा प्रभारी अधिकारी, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला पोलीस अधिकाऱ्याची इंट्री!...

 सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे आता नशिराबाद पोलीस ठाणेचा प्रभारी अधिकारी, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला पोलीस अधिकाऱ्याची इंट्री! 


 जळगांव जिल्हा. (संभाजी पुरीगोसावी) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 जळगांव जिल्हा पोलीस दलात काही पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशावरून करण्यात आल्या. नशिराबाद पोलीस स्टेशन येथे नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता मधुकर नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या आगमनाने पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीत नवी ऊर्जा संचारली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम महिला अधिकारी म्हणून API योगिता नारखेडे यांना चांगलेच ओळखले जाते.  यापूर्वी त्यांनी जळगांव जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात आणि विविध ठिकाणी कायदा-सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, महिला व बालकांवरील अत्याचार प्रकरणे, तसेच जनतेशी संवाद वाढविण्यावर विशेष भर देत प्रभावी कामगिरी बजावली आहे.

नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व न्याय्य दिलासा देणे, हा त्यांच्या कामाचा प्रमुख उद्देश राहणार आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक भूमिका, गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स आणि पोलीस-जनता संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

API योगिता नारखेडे यांच्या नियुक्तीचे नशिराबाद परिसरांत स्वागत होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांना सुरक्षिततेचा अधिक विश्वास मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरांतील सर्वसामान्य व नागरिकांमध्ये आपल्या पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महिला अधिकाऱ्याची वर्णी लागल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.

No comments